दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार, हसन मुश्रीफ, शेवगाव तालुक्यात नुकसान पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 03:47 PM2020-10-22T15:47:08+5:302020-10-22T15:47:26+5:30
बोधेगाव : शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यातील गावांमध्ये परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या आतमध्ये जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू. शासन शेतकºयांच्या पाठीशी आहे. त्यांना वाºयावर सोडणार नाही. काळजी करू नका, धीर धरा दिवाळी नक्कीच गोड होईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील शिंगोरी, आंतरवाली खुर्द, लाडजळगाव व बोधेगाव येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची गुरूवारी (दि.२२) पालकमंत्री मुश्रीफ पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ‘केदारेश्वर’चे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट भरपाई देण्याची व डिसेंबर २०१७ मध्ये ऊस दराबाबत झालेल्या आंदोलनावेळी स्थानिक शेतकºयांवर आंदोलनाशी काहीही संबंध नसताना दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याविषयीचे निवेदन दिले. यावेळी मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाहणी दौºयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, माजी सभापती दिलीप लांडे, जि. प. सदस्या संगीता दुसंगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.