राहाता नगरपालिकेत जागर आंदोलन

By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:27+5:302020-12-08T04:18:27+5:30

सरकारने सर्व सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्याने शनिवार व रविवारी कार्यालयाला सुटी असते. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी ...

Jagar Andolan in Rahata Municipality | राहाता नगरपालिकेत जागर आंदोलन

राहाता नगरपालिकेत जागर आंदोलन

सरकारने सर्व सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्याने शनिवार व रविवारी कार्यालयाला सुटी असते. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर नगरपालिका कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या बाबत नागरिकांनी नगरसेवकांच्या लक्षात ही घटना आणून देताच नगरसेवकांनी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून टाळ वाजवत जागर आंदोलन केले. तसेच उपस्थित नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची बिगरपगारी रजा लावून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी नगरसेविका नीलम सोळंकी, नगरसेवक साहेबराव निधाने, निवृत्ती गाडेकर, बाळासाहेब गिधाड, राजेंद्र अग्रवाल, दीपक सोळंकी, शंतनू सदाफळ, सुनील जाधव, समीर बेग, रामनाथ सदाफळ, जगन्नाथ गोरे, लक्ष्मण पडोळकर आदी उपस्थित होते.

०७ राहाता नगरपालिका आंदोलन

Web Title: Jagar Andolan in Rahata Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.