जैन संघटनेतर्फे डवरी समाजातील २०० लोकांना धान्य, किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:53 AM2020-04-02T11:53:30+5:302020-04-02T11:54:23+5:30
कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने कामगार तलाठ्यामार्फत ३१ कुटूंबाला बुधवारी (दि.१ एप्रिल) धान्य व किराणा देऊन त्यांचा दहा दिवसाचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवला आहे.
अशोक निमोणकर/
जामखेड : कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने कामगार तलाठ्यामार्फत ३१ कुटूंबाला बुधवारी (दि.१ एप्रिल) धान्य व किराणा देऊन त्यांचा दहा दिवसाचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवला आहे.
पाटोदा व भवरवाडी गावचे कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे हे कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी भवरवाडी येथे गेले होते. तेथे माळरानाच्या परिसरात पाल ठोकून असलेले नागरिक दिसले. यावेळी त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता आम्ही बहुरूपी लोक एक वर्षापासून गावाबाहेर आहे. बहुरूपीची सोंग घेऊन दररोजचा उदरनिर्वाह करतो. कोरोनासारख्या रोगामुळे शहर व गावच बंद असल्याने पुन्हा गावाकडे आलो आहे. आमच्याकडे कुपन नाही. आधारकार्ड नाही व रहायला घर नाही. दोन दिवसापासून आम्ही उपाशी आहोत. मुले शिळे टुकडे खाऊन जगत आहेत. आमच्या पोटाला काम द्या. आमची भूक भागवा अशी विनवणी या लोकांनी केली.
कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे यांनी जामखेड येऊन घडलेली घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितली. तहसीलदार नाईकवाडे यांनी ही माहिती भारतीय जैन संघटनेचे अमोल तातेड यांना दिली. त्यांनी तातडीने पाच किलो गहू व किराणा सामानाचे ३१ कीट तयार केले. ते कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे समवेत भवरवाडी येथील पालावर पोहोचले. पालात राहणा-या कुटूंबातील एका सदस्याला बोलावून घेऊन देऊन टाकले. उपाशीपोटी राहणाºया या कुटुंबाला धान्य मिळाल्याने त्यांचे चेहरे आनंदी झाले होते. या ३१ कुटूंबात सरासरी २०० च्या आसपास लहान, मोठे नागरिक आहेत. भारतीय जैन संघटनेने पालावर राहणाºया या उपाशी भटक्या समाजाची भूक आठ, दहा दिवसाची भागवली? परंतु पुढे काय? असा प्रश्न तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यापुढे होता. जामखेडला शिवभोजन थाळीचा पर्याय नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. तोपर्यंत शहरातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले. त्यांच्याकडून आठ पोते गहू मिळाला. या गव्हाचे वाटप भवरवाडी, मोहरी, जातेगाव या ठिकाणी पालात राहणाºया नागरिकांना वाटप केले.
लॉकडाऊनमुळे तालुक्यात कोणी उपाशीपोटी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. नागरिकांनी यासाठी आपल्यातला घास इतरांना देता येईल. तशी मदत धान्य, किराणा रूपी करावी, असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले.