जैन साध्वी किरण प्रभाजी महाराज यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:02 IST2019-10-13T12:54:17+5:302019-10-13T13:02:33+5:30
प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) नगर-राहुरी रोडवरील धामोरीफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जैन साध्वी किरण प्रभाजी महाराज यांचे निधन
अहमदनगर : प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) उज्ज्वलनगर जैन स्थानक परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सकाळी त्यांची डोली उज्वलनगर जैन स्थानकातून आनंदधाम येथे आणण्यात आली. यावेळी जैन धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी यांनी १३ मे १९५६ मध्ये पाचोरा येथे जैन धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी विहार करून धर्मप्रभावना केली. पूज्य कल्याणऋषीजी महाराज साहेब त्यांचे गुरु शिक्षक होते. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज साहेब महराज साहेब, पूज्य मोहनऋषीजी महाराज साहेब, पूज्य विनयऋषीजी महाराज साहेब, पूज्य उज्वलकुमारीजी महाराज साहेब यांनी त्यांना धर्मज्ञान दिले होते. पूज्य प्रमोदसुधाजी महाराज साहेब यांच्या त्या गुरुभगिनी होत्या. गेल्या आठ वर्षांपासून पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात वास्तव्यास होत्या. मागील एक वषार्पासून त्यांनी मौनसाधना सुरु केली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांनी ७५ साध्वीजींचा समावेश असलेल्या उज्वल संघाचीही स्थापना केली होती. या संघाच्या त्या प्रमुख होत्या.