श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:06 PM2020-08-21T13:06:41+5:302020-08-21T13:07:23+5:30

सुरेगाव येथील चौघांची  विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.  या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील चौघांनी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jalgaon connection of the murder of 'those' four in Shrigonda ..... | श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

श्रीगोंदा : सुरेगाव येथील चौघांची  विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.  या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील चौघांनी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.

      जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश यादव पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक अरविंद माने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे. 

      सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण ( वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४),   लिंब्या हाबºया काळे (वय २२) या चौघांच्या हत्या प्रकरणी अक्षदा कुंजीलाल चव्हाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून आक्षय उंबºया काळे व मिथुन उंबºया काळे (रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) इतर पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत. 

दरम्यान, मयत झालेल्या व्यक्तींनी गुरुवारी चार वाजण्याच्या विसापूर फाट्याजवळ जळगाव येथील धनिकांना स्वस्तात सोन्याचे दाखवून बोलविले. ते ठरल्याप्रमाणे आले.  चौघांनी पैशांची मागणी केली. पैशाची बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर जळगावमधील धनिकांतील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला आणि चौघांना जागीच ठार करून जळगाव दिशेने निघून गेले. 

 ज्या ठिकाणी चौघांची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी मयत व आरोपीत झटापट झाली. एका जळगाव येथील आरोपीचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. ते एटीएम कार्ड पोलिसांच्यशी हाती लागले असल्याची माहिती आहे.
 

Web Title: Jalgaon connection of the murder of 'those' four in Shrigonda .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.