जामखेड गोळीबार प्रकरण : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:28 PM2020-03-01T18:28:21+5:302020-03-01T18:28:52+5:30
जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार करणाºया दोघा आरोपींना पोलिसांनी सहा तासात जेरबंद केले होते. त्यांना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जामखेड : जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार करणाºया दोघा आरोपींना पोलिसांनी सहा तासात जेरबंद केले होते. त्यांना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील एका दुकानासमोर विकास थोरात व विशाल मगर यांनी बाळू डोके याच्याशी वाद घातला. यावेळी त्या दोघांनी डोके याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला होता. गोळी हुकविल्याने तो बचावला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या सहा तासात विकास थोरात, विशाल मगर यांना अटक केली.
बाळू दादा डोके (रा. भुतवडा, जामखेड) याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींना जामखेड न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी आरोपींवर आणखी काही गुन्हे आहेत का? याबाबत त्यांचे यापूवीर्चे रेकॉर्ड तपासले जात आहे. आरोपींना रिव्हॉल्व्हर कोठून मिळाले. त्यांचा व्यवसाय काय आहे? या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्या आरोपींना चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.