जामखेडमध्ये अप्सरा उतरल्या महाश्रमदानाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:46 PM2018-05-22T22:46:43+5:302018-05-22T22:47:04+5:30
‘श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, रिमझिम पडतो’ ‘लांडोरीसंगे मोर थुईथुई नाचतो’ या गाण्याच्या तालावर जामखेडमधील अप्सरांनी नृत्य सादर करून श्रमदानासाठी आलेल्या उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रमदानही केलं.
जामखेड – ‘श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, रिमझिम पडतो’ ‘लांडोरीसंगे मोर थुईथुई नाचतो’ या गाण्याच्या तालावर जामखेडमधील अप्सरांनी नृत्य सादर करून श्रमदानासाठी आलेल्या उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रमदानही केलं.
निमित्त होते, जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील वॉटर कप स्पर्धेतील महाश्रमदानाचे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सावरगांव सहभाग झाले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जामखेड येथील कलाकेंद्रातील नृत्य करून पोट भरणाऱ्या महीला सिनेअभिनेते अमिरखान राबवीत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होत आज श्रमदान केले. श्रमदान करण्यासाठी अप्सरांनी ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष अरूण जाधव यांच्याशी चर्चा केली. जाधव यांनी तात्काळ यास होकार देऊन सावरगाव येथे श्रमदान व नृत्य व गाणे सादर करून त्यातून श्रमदानाला उत्स्फूर्त करण्याची योजना आखण्यात आली. त्यांनी वॉटर कप स्पर्धेतील शेवटच्या दिवशी सहभागी होण्याचा दिवस निवडला.
सायंकाळी पाचच्या सुमारास जवळपास ५० अप्सरा सावरगाव येथील श्रमदानासाठी कामावर गेल्या. तेथे उपस्थित सावरगाव नागरिक व जामखेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व कर्मचारी, नगरसेवक व इतर प्रतिष्ठित नागरिकांसह गावातील लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपुढे पाणी आडवा..... पाणी जिरवा.... पाणी वाचवा असा जयघोष केला.
अप्सरा अलका जाधव, जया अंधारे,ज्योती पवार, उमा जाधव, संजीवनी जाधव, मंदा चंदन, राजश्री जाधव यांच्या सहकारी नृत्यांगना वाद्यवृंदासह आल्या त्यांनी विविध लावण्या व गाणे सादर करून ढोलकीच्या तालावर नृत्य केले. अप्सरांच्या या अदाकारीने श्रमदानासाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये जोश भरला अर्धा पाऊण तासाच्या अप्सरांच्या अदाकारीने उपस्थितांचे मने जिंकली. यानंतर अप्सरांनी उपस्थितासह सर्वांच्या अंगात कामाचे तुफान आले जवळपास दोन अडीच तास डोंगर पायथ्याशी चर खोदून महाश्रमदान केले.
जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी देखील या उपक्रमात आपल्या टिमसह सहभागी होऊन श्रमदान केले. ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष अरूण जाधव, नगरसेवक गुलचंद अंधारे, अमित जाधव, सनी जाधव, विशाल जाधव व संतोष गर्जे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. सावरगांवचे सरपंच व पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक दहिफळे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले.