जामखेड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाशी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:12 PM2019-09-27T18:12:25+5:302019-09-27T18:14:00+5:30
राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील राष्टवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे इडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यांना वाशी येथे दुपारच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे.
जामखेड : राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील राष्टवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे इडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यांना वाशी येथे दुपारच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे.
जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी नरेंद्र जाधव, शरद शिंदे, गणेश चव्हाण, कांतीलाल वाळुंजकर, सचिन डोंगरे, हनुमंत भोसले यांना पवार यांच्या समर्थन करण्यासाठी मुंबईला सकाळीच रवाना झाले होते. मुंबई येथे जात असताना नवी मुंबई पोलिसांनी वाशी येथे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिका-यांना पोलिसांनी अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे.