जामखेडचा शनिवारचा आठवडा बाजार १५ एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:11+5:302021-03-27T04:22:11+5:30
जामखेड : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ...
जामखेड : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने जामखेडचा शनिवारी (दि.२६) भरणारा आठवडे बाजार बंद ठेवला आहे. १५ एप्रिलपर्यंत आठवडे बाजार बंद राहणार आहे, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून जामखेड शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुुधवारी डॉ. अरोळे हॉस्पिटल येथे आढावा घेऊन गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचेे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी १४ दुकानात शासनाच्या नियमाचा भंग झाल्याचे दिसल्याने ते सात दिवसांसाठी सील केले. खर्डा येथेही ७ दुकाने सील केली होती.