जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतले शनी दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:18 PM2023-12-16T13:18:14+5:302023-12-16T13:21:10+5:30
राज्यपाल सिन्हा यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला. त्यानंतर चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर तेल अर्पण करून दर्शन घेतले.
नेवासा : जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनी शिंगणापूर येथे शनिवारी दुपारी १२ वाजता दर्शन घेतले. दुपारची महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यपाल सिन्हा यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला. त्यानंतर चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर तेल अर्पण करून दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात अध्यक्ष भागवत बनकर व विश्वस्तांनी राज्यपाल मनोज सिन्हा यांचा शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. विश्वस्ताची चर्चा करताना राज्यपाल सिन्हा यांनी सांगितले, की यापूर्वी मी काही वर्षापूर्वी शनि दर्शनाला आलो होतो. उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी पानसनाला प्रकल्पाची माहिती दिली.
राज्यपाल सिन्हा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात पोलिसांचा मोठा ताफा ठेवण्यात आला होता. काही काळ दर्शन बंद करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , शेवगाव उप विभागीय अधिकारी सुनील पाटील, देवस्थानचे उप अध्यक्ष विकास बनकर, विश्वस्त पोपटराव कुरुट, दीपक दरंदले, बाळासाहेब बोरुडे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले उपस्थित होते.