बेलपिंपळगावात आजपासून आठ दिवस ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:13+5:302021-05-28T04:17:13+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावल्याने शुक्रवार (दि.२८) पासून शुक्रवार ...
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावल्याने शुक्रवार (दि.२८) पासून शुक्रवार (दि.४ जून)पर्यंत सलग आठ दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्याची माहिती सरपंच निकिता गटकळ यांनी दिली.
याप्रसंगी गुरुवारी दुपारी कोरोना दक्षता समिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. या कालावधीत दवाखाना आणि मेडिकल दुकाने वगळता अन्य सेवेची दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध संकलनाला वेळेची मोकळीक देण्यात आली आहे. घरपोहोच सेवांना मुभा देण्यात आली असून, नागरिकांनी आठ दिवस पुरेल इतका वस्तूंचा साठा करून ठेवावा. कोरोना काळातील कोणीही नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आतापर्यंत गावात कोरोनाच्या आकडेवारीने शंभरी गाठली असून, सध्या एकवीस बाधित रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, सरपंच निकिता गटकळ, उपसरपंच बंडोपंत चौगुले, ग्रामसेवक उदय मिसाळ, कामगार तलाठी सोपान गायकवाड, कामगार पोलीसपाटील संजय साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे, किशोर गारुळे, राजेंद्र साठे आदी उपस्थित होते.
270521\919404792560_status_3170d8471c2f4c0fb203c46d315f880f.jpg
बेलपिंपळगावात आजपासून आठ दिवस जनता कर्फ्यु