घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:28+5:302021-05-05T04:33:28+5:30

........ कोरोनाग्रस्त रुग्णाचा मोबाईल चोरला अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी ...

Jewelry, money stolen by burglary | घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

........

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मोबाईल चोरला

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदनगर येथील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल केरूळकर हे पुढील तपास करीत आहेत.

.......

घरफोडी करून चोरी

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २९ ते ३० एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अशोक सिताराम सालके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल निकम हे पुढील तपास करीत आहेत.

..........

Web Title: Jewelry, money stolen by burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.