सरकारविरोधात राळेगणसिद्धीमध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 12:53 PM2019-02-02T12:53:29+5:302019-02-02T13:24:18+5:30

राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. 

Jhel Bharo Movement of the Ralegan Sansthan village villagers against the government | सरकारविरोधात राळेगणसिद्धीमध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन

सरकारविरोधात राळेगणसिद्धीमध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन

ठळक मुद्देराळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला आहे.

अहमदनगर - राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पत्राला उत्तर दिले. 'तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा' एवढाच उल्लेख पत्रात करून शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. यामुळे राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. 

पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात पुरूषांसोबत महिलाही देखील सहभागी झाल्या आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला आहे. ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन केले आहे. आंदोलादरम्यान काही ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही केंद्र व राज्य सरकारकडून अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही. केंद्र सरकार त्यांच्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करू, असे अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्पष्ट केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले. २५ जानेवारी रोजी पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांना पत्र पाठविले. ते शुक्रवारी हजारे यांना मिळाले. परंतु, त्यात हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले.

 केंद्र व राज्य सरकारने हजारे यांच्या मागण्या व उपोषणाबाबत अधिकृत संपर्क उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत केलेला नाही. शेतमालाला खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळणे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल, लोकायुक्त कायदा हे शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. सरकार आपल्या मागार्ने काम करील, आम्ही आमच्या मागार्ने वाटचाल करू. वेळ लागेल पण प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शरीरात प्राण असेल तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार हजारे उपोषणाच्या चौथ्या दिवशी यांनी व्यक्त केला.

Web Title: Jhel Bharo Movement of the Ralegan Sansthan village villagers against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.