माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:01+5:302021-02-27T04:27:01+5:30
राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिरात शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची विद्यार्थ्यांसमवेत प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ...
राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिरात शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची विद्यार्थ्यांसमवेत प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गटविकास अधिकारी चौधरी बोलत होते. पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, विस्तार अधिकारी ए.बी. गोंदके, के.डी. सरोदे, उपसरपंच गोकुळ कानकाटे, ग्रामविकास अधिकारी बी.डी. नाडेकर उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. यासाठी एकदा वापर होणाऱ्या प्लास्टिकचा त्याग करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावत त्याचे संवर्धन करावे. घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग जलसंवर्धन आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत झाडांची रोपे दिली जातील, ती झाडे विद्यार्थ्यांना दत्तक दिली जातील. हे झाड आयुष्यभर त्या विद्यार्थ्यांची आठवण राहील.
प्राचार्य मनोहर लेंडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक कृषी अधिकारी कोष्टी यांनी केले, तर आभार धनंजय पगारे यांनी मानले.
२६ राजूर