सातवीतील सिद्धीने लाॅकडाऊनमध्ये जोपासली प्रोट्रेट चित्रकला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:33+5:302021-05-23T04:19:33+5:30
सिद्धी हिचे मुळगाव राहाता तालुक्यातील खडकेवाके असून तिचे वडील प्रा. डाॅ. अजित रामभाऊ लावरे हे विळद येथील इंजिनिअरिंग ...
सिद्धी हिचे मुळगाव राहाता तालुक्यातील खडकेवाके असून तिचे वडील प्रा. डाॅ. अजित रामभाऊ लावरे हे विळद येथील इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक असल्याने तिचे शिक्षण नगर येथे सुरू आहे. लहानपणापासून तिला चित्रकलेची आवड, बालबोध चित्र काढताना तिचे आजोबा शिल्पकार उत्तम पाचारणे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रोट्रेट चित्रकार सुरेशचंद्र आवारी मार्गदर्शन करायचे. या चित्रगोष्टींच गारुड तिच्या मनात घर करून राहिले असून ती रेखाचित्रे रेखाटण्याचा छंद जोपासत आहे.
रेषांची किमया तिने आत्मसात केली असून व्यक्ती चित्र हुबेहूब साकारण्यासाठी नेमके शेडिंग करण्याचे तंत्र तिला या वयात साध्य झाले आहे.
रंगसंगतीचा अभ्यास घरातून सुरू आहे. कागदावर रेखाटलेल्या व्यक्तीरेखामध्ये रंगभरण करून ती चित्रे बोलकी करण्याची कला शिकण्याची तिची धडपड सध्या सुरू आहे. तिच्या चित्रकलेचे कौतुक शिक्षक, नातेवाईक यांचेकडून होत आहे.
सोबत फोटो..