लोकशाहीसाठी पत्रकारिता टिकली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:44+5:302021-02-10T04:21:44+5:30

नगर येथे सोमवारी पीस फाउंडेशनच्या वतीने आयोजित लोकसंवाद या उपक्रमात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सद्य:स्थिती आणि आपण’ या विषयावर ते बोलत ...

Journalism must survive for democracy | लोकशाहीसाठी पत्रकारिता टिकली पाहिजे

लोकशाहीसाठी पत्रकारिता टिकली पाहिजे

नगर येथे सोमवारी पीस फाउंडेशनच्या वतीने आयोजित लोकसंवाद या उपक्रमात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सद्य:स्थिती आणि आपण’ या विषयावर ते बोलत हेते. यावेळी लॉ कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र तांबे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, कॉ. सुभाष लांडे व पीस फाउंडेशनचे अध्यक्ष अर्शद शेख उपस्थित होते.

सरोदे म्हणाले, लोकशाही आपल्या मालकीची आहे, अशी भावनांची नैसर्गिक अभिव्यक्ती ज्या देशातील नागरिक व्यक्त करतात तेव्हाच तेथे लोकशाही कार्यान्वित होते. अर्णब गोस्वामीच्या अरेरावीपूर्ण पत्रकारितेमुळे मीडिया ट्रायलच्या संदर्भात नियंत्रण आणणाऱ्या मार्गदर्शक सूचना उच्च न्यायालयाने जारी केल्या आहेत. समाजात तेढ निर्माण होईल, न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांबाबत टीव्ही वृत्तवाहिन्यांवर समांतर न्यायालय चालवू नये, संशयित व्यक्तीला थेट आरोपी म्हणून जाहीर करू नये, अर्धवट माहितीच्या आधारे तपास यंत्रणेवर आरोप करू नये, हेतुपुरस्सर कुणाचे चारित्र्य हनन करू नये, या सूचनांमुळे जबाबदार पत्रकारिता निर्माण होण्याची वाटचाल सुरू होऊ शकते, असे ॲड. सरोदे म्हणाले.

अर्शद शेख यांनी जागतिक मानवीमूल्य, अभिव्यक्तीची होणारी गळचेपी आदींबाबत भूमिका मांडली. प्राचार्य तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सुरेश पठारे, सुभाष लांडे, सुधीर लंके, अर्शद शेख, विठ्ठल बुलबुले, आणि प्रेक्षकांनी विषयाच्या आनुषंगाने असीम सरोदे यांना प्रश्न विचारून चर्चा घडवून आणली.

------

फोटो ०९ सरोदे

ओळी- पीस फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोमवारी झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलताना ॲड. असीम सरोदे.

Web Title: Journalism must survive for democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.