पत्रकार मारहाण प्रकरण : शिर्डीमधील पत्रकारांनी दिले पोलिसांना निवदेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:25 PM2019-03-21T12:25:36+5:302019-03-21T12:26:24+5:30

राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली.

Journalist Marathon Case: Filed by the reporters given by Shirdi | पत्रकार मारहाण प्रकरण : शिर्डीमधील पत्रकारांनी दिले पोलिसांना निवदेन

पत्रकार मारहाण प्रकरण : शिर्डीमधील पत्रकारांनी दिले पोलिसांना निवदेन

शिर्डी : राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद कालपासूनच जिल्हाभर उमटू लागले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ शिर्डीमधील पत्रकारांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन दिले.
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार नवनाथ दिघे, सतीश वैजापूरकर, नितीन मिराने, मनोज गाडेकर, सुनील दवंगे, बाबा मणियार, डॉ. राजेंद्र जाधव, दिलीप खरात, रवी महाले, संदीप दवंगे, लोकमतचे प्रमोद आहेर उपस्थित होते.

Web Title: Journalist Marathon Case: Filed by the reporters given by Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.