पत्रकार मारहाण प्रकरण : गुंडगिरीविरोधात राहुरीकर एकवटले, पोलीस ठाण्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:17 PM2019-03-21T13:17:09+5:302019-03-21T13:17:24+5:30
जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले व डॉ. विजय मोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरीत विविध संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते पोलीस ठाणे असा भव्य मोर्चा काढण्यात आला.
अहमदनगर : जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले व डॉ. विजय मोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरीत विविध संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते पोलीस ठाणे असा भव्य मोर्चा काढण्यात आला.
राहुरीच्या गुरुवारी आठवडे बाजार असतो. मात्र,आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता दररोजच्या त्रासाला कंटाळून राहुरी आता नाही तर कधीच नाही या प्रमाणे स्वत:हून कडकडीत बंदमध्ये सहभाग नोंदविला. पोलिस ठाण्यासमोर आयोजीत निषेध सभेत विविध संघटना व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मनोगत व्यक्त करून तीव्र शब्दात निषेध केला.
पोलिसांना कायदा व सुवस्था राखण्यात यश येत नसेल तर, गुंडांच्या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. संबधित आरोपीवर मोक्का लावावा या आरोपीना पाठिशी घालणा-या पोलिसावरही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घावा लागेल असे मत आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, राहुरीचा बिहार एका दिवसात झाला नसून त्यांना पोसणारे मास्टरमाईड कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी केली. दरम्यान शिवसेनेचे उत्तर जिल्हा रावसाहेब खेवरे,जिल्हा परिषेद सदस्य शिवाजी गाडे, शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, मच्छिद्र गुंड, व्यापारी राजेंद्र दरक, डॉ. सुधिर क्षिरसागर, डॉ. धनजय मेहेत्रे, नवाज देशमुख, पत्रकार राजेद्र वाडेकर, वसंतराव झावरे, रफिक शेख, सुनिल भुजाडी, बाजार समितीचे संचालक महेंद्र तांबे, अॅड. राहुल शेटे, निर्मला मालपाणी, वैशाली नान्नोर, नवाज देशमुख, शेतकरी संघटनेचे रवी मोरे, राजुभाउ शेटे मित्र मंडळाचे मच्छिद्र देवकर, काँग्र्रेसचे अध्यक्ष चाचा तनपुरे आदींसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिर्डी संस्थेचे माजी विश्वस्त सुरेशशेठ वाबळे, देवळाली पालिकेचे नगरध्यक्ष सत्यजीत कदम, शिवाजी कपाळे, डॉ प्रकाश पवार, ताराचंद तनपुरे, प्रकाश पारख, विजय डौले, अशोक तनपुरे, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवने, गणेश हापसे, नितिन तनपुरे, सचिन वराळे, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, दिलीप चौधरी, प्रकाश भुजाडी, सचिन ठुबे, अतिक बागवान, संतोश लोढा, संभाजी तनपुरे, देवेद्र लांबे,रवि शिवाजी डौले, रविद्र आढाव, अशोक तुपे, राजेद्र खोजे, सलिम सय्यद, ज्ञानेश्वर पोपळघट, नरेंद्र शिंद, मच्छिद्र गुलदगड, सुरेश निमसे, डॉ भळगट, संकेत दुधाडे उमेश शेळके, संदिप आढाव, कांता तनपुरे, बाबुराव गुंजाळ, अनिल इंगळे आदींसह राहुरी शहर व्यापारी असोसिएशन ,मराठा महा संघ राहुरी, संभाजी ब्रिगेड राहुरी छावा संघटना, राहुरी मराठाएकीकरण समिती प्रहार संघटना, राहुरी यशवंत सेना, राहुरी पत्रकार संघटना, राहुरी ,डॉ असोसिएशन, राहुरी आडवी पेठ व्यापारी मंडळ, राहुरीतील विविध संघटनेचे प्रतिनिधी व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.