पत्रकार मारहाण प्रकरण : हल्लेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करा, नेवासेतील पत्रकारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:03 PM2019-03-21T13:03:16+5:302019-03-21T13:05:15+5:30
राहुरी येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतीनिधी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करून तसेच हल्लेखोरांवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी,
नेवासा : राहुरी येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतीनिधी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करून तसेच हल्लेखोरांवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसिलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी निषेध सभा घेण्यात आली.
राहुरी शहरात मोटार सायकल चोरतांना एका गुंडाला रंगेहाथ पकडल्या नंतर त्याला सोडून देण्यासाठी गावगुंडांनी एक तास शहरामध्ये धुमाकुळ घालुन दंगल केली.त्यावेळी दैनिक लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले हे वृत्तसंकलनासाठी घटनास्थळी गेले असता त्यांचा मोबाईल हिसकावुन घेवून जबर मारहाण करण्यात आली. त्यावेळी व्यापा-यांना ही जबर मारहाण करण्यात आली.
या घटनेचा नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत कारवाई करावी.तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे नोंदणीकृत वृत्तपत्राच्या सर्व प्रतिनिधींना सरंक्षण मिळावे.अशी मागणी करण्यात आली.
निषेध सभेप्रसंगी अध्यक्ष विनायक दरंदले, सचिव सुखदेव फुलारी, सुनील गर्जे, कारभारी गरड, उमाकांत भोगे, बाळासाहेब नवगिरे, दिलीप शिंद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, अनिल गर्जे, कैलास शिंदे, मकरंद देशपांडे, संतोष टेमक, शंकर नाबदे, पवन गरुड, सचिन दसपुते, उमाकांत भोगे, गणेश बेल्हेकर, रमेश पाडळे, मंगेश निकम, अभिषेक गाडेकर, विठ्ठल उदावंत, श्रीनिवास रक्ताटे, रमेश शिंदे, देविदास चौरे, इकबाल शेख, मोहन गायकवाड, सतीश उदावंत, राजेंद्र वाघमारे, सुनील पंडित, इस्माईल शेख, चंद्रकांत दरंदले, संदीप गाडेकर उपस्थित होते.