पत्रकार मारहाण प्रकरण : श्रीगोंदा बंद : पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:15 PM2019-03-21T12:15:23+5:302019-03-21T12:16:09+5:30
लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे श्रीगोंद्यातही पडसाद उमटले. सकाळपासूनच श्रीगोंदा शहरात बंद पाळण्यात आला आहे.
श्रीगोंदा : लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे श्रीगोंद्यातही पडसाद उमटले. सकाळपासूनच श्रीगोंदा शहरात बंद पाळण्यात आला आहे. श्रीगोंद्यातील पत्रकारांनी पोलिस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन दिले.
पत्रकार अमोल गव्हाणे, शिवाजी सांळुके, विशाल चव्हाण, लोकमतचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे, मिरा शिंदे, अर्शद शेख, अंकुश शिंदे, शरद शिंदे, उत्तम राऊत, अमोल उदमले, सुहास कुलकर्णी, दादा सोनवणे, मच्छिंद्र सुद्रिक, मुस्ताक पठाण, अंकुश तुपे, राजू शेख या पत्रकारांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेतली. येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राहुरीतील पत्रकारावरील हल्ला प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी सांगितले.