सात तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:49+5:302021-01-13T04:49:49+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले, जामखेड, पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, कर्जत आणि शेवगाव या सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी ...

The journey of seven talukas towards coronation | सात तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

सात तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले, जामखेड, पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, कर्जत आणि शेवगाव या सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाला आहे. या तालुक्यांमध्ये सध्या सरासरी १२ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. उर्वरित सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा अजूनही प्रादुर्भाव आहे. त्यात नगर शहर व तालुका, संगमनेर, राहाता, श्रीगोंदा, कोपरगाव, पाथर्डी या तालुक्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या शनिवारी (दि. ९) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्येच सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसते आहे. सातही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तुलनेने कमी झालेली आहे. शनिवारच्या अहवालातही अकोले आणि कर्जत तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. एक हजारांऐवजी सातशे ते आठशे चाचण्या होत आहेत. त्यातही कोणतीही लक्षणे नसलेल्यांचीच संख्या जास्त आहे. मात्र, अजूनही गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झालेले असून रोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होत आहे.

--------------

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

तालुका ॲक्टिव्ह रुग्ण

नगर शहर २८८

अकोले १२

जामखेड १०

कर्जत ४

कोपरगाव ७५

नगर ग्रामीण ८९

नेवासा १९

पारनेर १३

पाथर्डी २४

राहाता ७०

राहुरी १०

संगमनेर ९१

शेवगाव १६

श्रीगोंदा ५५

श्रीरामपूर १५

कन्टोन्मेंट बोर्ड १६

मिलिटरी हॉस्पिटल २

जिल्ह्याबाहेरील २५

एकूण ८३४

---

सोबत एक चौकट

कोरोना चाचण्यांची स्थिती (कालच्या हॅलो चारवरून घेणे)

Web Title: The journey of seven talukas towards coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.