सीए विद्यार्थी शाखेमार्फत उद्योग जगताची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:50+5:302020-12-31T04:21:50+5:30
अहमदनगर : पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच कोणत्याही गोष्टीचे आकलन होते. त्यानुसार अहमदनगर येथील सीए विद्यार्थी शाखेने रविवारी (दि.२७) ...
अहमदनगर : पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच कोणत्याही गोष्टीचे आकलन होते. त्यानुसार अहमदनगर येथील सीए विद्यार्थी शाखेने रविवारी (दि.२७) सीए विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे नियोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारस मिरकॉल, कटारिया पॉलिमर प्रा. लि. व अरिहंत कोल्ड स्टोरेजला भेट दिली. यामध्ये उद्योजकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व अल्पोपाहाराची व्यवस्था केली. संपूर्ण युनिट स्वत: विद्यार्थ्यांबरोबर फिरून सर्व कार्यपद्धती समजावून सांगितली. अरिहंत कोल्ड स्टोरेजमध्ये २० अंश सेल्सिअस तापमानाचाही रोमांचकारी अनुभव घेतला. या अशा उपक्रमामधूनच विद्यार्थ्यांची दूरदृष्टी तयार होते, असे अहमदनगर विकासचे चेअरमन सीए संदीप देसरडा यांनी व्यक्त केले. या उपक्रमास सीए गौरव बोथरा, सीए प्रवीण कटारिया, पवन कटारिया, अनमोल कटारिया, आनंद गांधी, कुणाल बडजाते, पारस चुडिवाल या उद्योजकांनी सहकार्य केल्याबद्दल सीए किरण भंडारी यांनी आभार मानले. या औद्योगिक सहलीसाठी सीए परेश बोरा, स्नेहा देसरडा, अमरनाथ देशमुख, विकासचे व्हाईस चेअरमन यश श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले. (वा. प्र.)