स्वीकृतवरून भाजपमध्येच जुगलबंदी; एक पदाधिकारी म्हणाले, किशोर डागवाले ‘घोडेबाजाराचे जनक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:00 PM2020-09-29T14:00:18+5:302020-09-29T14:00:51+5:30
स्वीकृतसाठी आता भाजमध्येच अंतर्गत जुगलबंदी रंगली आहे. किशोर डागवाले हेच खरे घोडेबाजाराचे जनक आहेत, असा टोला भाजपच्या एका पदाधिका-याने लगावला आहे.
अहमदनगर : स्वीकृतसाठी आता भाजमध्येच अंतर्गत जुगलबंदी रंगली आहे. किशोर डागवाले हेच खरे घोडेबाजाराचे जनक आहेत, असा टोला भाजपच्या एका पदाधिका-याने लगावला आहे.
‘स्वीकृतसाठी मी इच्छुक नाही’, असे सांगत भाजपचेच ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी मात्र भाजपच्या घोडेबाजारात आपल्याला रस नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर शहर भाजपच्या एका पदाधिका-याने डागवाले यांचा समाचार घेतला आहे. डागवाले यांनीच शिवसेना फोडली. त्यांच्यामुळेच महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली होती. एका पक्षात रहायचे आणि महापौरपदाच्या दुस-या पक्षातील उमेदवाराला मतदान करण्यासारखे अनेक कामे त्यांच्या नावावर आहेत. घोडेबाजाराचे जनक, संस्थापक अशा उपाध्या डागवाले यांनाच देता येतील, अशी टीकाही पदाधिका-याने केली. त्यामुळे आता भाजपमध्येच जुगलबंदी रंगली आहे.
दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनीही भाजपचे आणखी काही जण भाजपमध्ये येणार असे म्हटले होते. त्या अनुषंगाने डागवाले यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का? आणि मनोज कोतकर यांच्याप्रमाणे त्यांनाही पद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी सहकार्य केले आहे. या भाजप नेत्यामुळेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वीकृत होण्याचा डागवाले यांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे.