जुलै महिन्यातच सीना धरण ५० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 01:57 PM2020-07-10T13:57:12+5:302020-07-10T13:57:46+5:30
सीना नदीच्या उगमस्थानात सातत्याने पडणा-या पावसामुळे जुलै महिन्याच सीनाधरण ५० टक्के भरले आहे. यामुळे धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मिरजगाव : सीना नदीच्या उगमस्थानात सातत्याने पडणा-या पावसामुळे जुलै महिन्याच सीनाधरण ५० टक्के भरले आहे. यामुळे धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सीनाधरणात पहिल्यांदाच जुलै महिन्यात ५० टक्के पाणी साठा झाल्याने यावर्षी सीना धरण नक्कीच ओव्हरफ्लो होईल आशा निर्माण झाली आहे. सीना नदीचे उगमस्थान अहमदनगर शहर व सीना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे. सीना नदीवरील सर्व बंधारे भरून सीना नदीतून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक धरणात सुरू आहे.
सीना धरणाची क्षमताही २४०० दशलक्ष घनफूट आहे. धरणात सध्या १२५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. अजूनही सीना नदीची आवक सुरू आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली.