जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:16 PM2018-05-29T18:16:41+5:302018-05-29T18:16:48+5:30

जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.

Junkhed water pipeline: Water closure after 12 hours. Water supply stop | जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

जामखेड : जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.
या तलावापासून पाचशे मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जाते. हा शेतकरी रात्री बाराच्या सुमारास जलवाहिनी जाते, त्याठिकाणी जेसीबी मशिनच्या साह्याने काम करीत होता. जेसीबी चालकाला जलवाहिनीचा अंदाज न आल्याने त्याच्याकडून जलवाहिनीवर जेसीबीचे खोरे पडल्याने ती फुटली. दुरूस्तीचे काम होईपर्यंत जामखेड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अगोदरच चार दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होत असताना जलवाहिनी फुटल्याने आता हे नवे जलसंकट ओढावले आहे.
सोमवारी रात्री बाराच्या जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणी पुरवठा कर्मचाºयांनी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांना दिली. परंतु रात्रीच्या वेळी काहीच काम करता येत नसल्याने तेथे कोणी गेले नाही. मंगळवारी सकाळी महेश निमोणकर, नगरसेवक मोहन पवार व यानंतर मुख्याधिकारी विनायक औंधकर व कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाया जाणारे पाणी बंद करण्यासाठी व्हॉल्व बंद करणे गरजेचे होते. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीपुरवठा करणाºया कर्मचाºयांना व्हॉल्व लवकर सापडला नाही. मंगळवार दुपारी एक वाजता व्हॉल्व सापडल्यानंतर तो बंद करून दुरूस्तीसाठी कर्मचारी सरसावले.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाºया भुतवडा तलावात मंगळवार दुपारपर्यंत २८ .४३ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा होता. शहराला दररोज पाणी दिले तरी ते आणखी चार महिने पुरणार आहे. परंतु शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जिर्ण झालेली आहे. तसेच भुतवडा तलाव ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सहा कि. मी. लांबीची जलवाहिनी ४५ वर्षे जुनी व जिर्ण झाली आहे. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता या जुन्या जलवाहिनीवरून सर्व भागात पाणी मिळण्यासाठी पाच दिवस लागत आहेत. मंगळवारी दुपारनंतर जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संताजीनगर, मोरेवस्ती, राळेभात गल्ली, शिक्षक कॉलनी, मिलिंदनगर या भागाला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल झाले.

 

Web Title: Junkhed water pipeline: Water closure after 12 hours. Water supply stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.