औरंगाबादमधील 'त्या' पुलाला काकासाहेब शिंदेचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 08:22 PM2018-07-25T20:22:08+5:302018-07-25T20:43:18+5:30
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.
अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले.
बुधवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड आदींनी शिंदे यांच्या कुटुुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष संगीता चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, वीर भगतसिंग परिषदेचे अध्यक्ष शुभम काकडे, अच्युत गाडे, गणेश गायकवाड, विजय खेडकर यांची उपस्थिती होती.