कोपरगावातील ब्राम्हणगावात ढगफुटी ? ओढ्या-नाल्यांसह घरामध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 02:35 PM2019-06-23T14:35:51+5:302019-06-23T17:33:56+5:30
तालुक्यातील ८ हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या ब्राम्हणगावात शनिवारी रात्री दोन ते अडीच तास
कोपरगाव : तालुक्यातील ८ हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या ब्राम्हणगावात शनिवारी रात्री दोन ते अडीच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील शेकडो घरामध्ये पाणी शिरल्याने सर्वत्र दानादन झाली यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी संपूर्ण तालुक्यात संततधार पाऊस झाला. या परिसरात ढगफुटी झाल्याने सर्वत्र दाणादाण झाली आहे. गावाजवळून जाणा-या नाल्याचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांच्या घरात दोन ते अडीच फुट पाणी होते. यामध्ये संसारोपयोगी भांडे, कपडे, घरातील शालेय विधार्थ्यांच्या वह्या, पुस्तके पुरात वाहून गेले तर सर्व धान्य ओले झाले होते. तसेच एक गाय तसेच काही शेळ्या, मेंढ्या मृत झाल्या आहेत. घराच्या भिंती पडल्या आहेत.
दरम्यान प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी भेट देऊन पाहणी करून तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तर संजीवनी उधोग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व काळे उधोग समूहाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी ग्रामस्थांच्या नाष्टा व जेवणाची सोय केली. मागील वर्षी २१ जून रोजी मुसळधार पावसामुळे अशीच घटना चांदेकसारे येथील आनंदवाडी येथे घडली होती.