खर्डा येथे कानिफनाथ यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:31+5:302021-03-27T04:22:31+5:30
खर्डा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले जामखेड तालुक्यातील खर्डा व परिसराचे ग्रामदैवत असलेली कानिफनाथ यात्रा रद्द करण्यात आली. हा ...
खर्डा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले जामखेड तालुक्यातील खर्डा व परिसराचे ग्रामदैवत असलेली कानिफनाथ यात्रा रद्द करण्यात आली. हा निर्णय पोलीस चौकी येथे सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता व यात्रा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ठरावीक लोकच गावातून येऊन पूजन करतील. मंदिराच्या काठ्या ५० ते ६० फूट असतात. यंदा मानाच्या काठ्या दहा फुटांच्याच ठेवण्याचा निर्णय झाला. यात्रेदिवशी काठ्यांचे पूजन करावे, परिसरात भाविकांनी मंदिराकडे न येता घरी बसूनच दर्शन घ्या, असे आवाहन करण्यात आले. रविवारी (दि.२८) होळीच्या दिवशी यात्रेचा प्रमुख दिवस असतो. त्या दिवशी खर्डा शहर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ पाटील, वैभव जामकावळे, गणेश शिंदे, प्रकाश गोलेकर, शिवाजी भोसले, महालिंग कोरे, दादा जावळे, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, किशोर दुशी, मदन पाटील, राजू मोरे, बाबासाहेब मोरे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, अविनाश ढेरे आदी उपस्थित होते.