करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:31 PM2018-10-09T12:31:46+5:302018-10-09T12:31:54+5:30
काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
करंजी : काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काल मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी करंजी गावाला लक्ष करित गावातील राजेंद्र दिलीप अकोलकर, जाकीर मणियार, योहान गणपत क्षेत्रे, लिलाबाई क्षेत्रे, म्हातारदेव अकोलकर, गोपिनाथ रामनाथ अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, संजय मुखेकर यांच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून घरातील सामानाची उचका- पाचक घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल, गळ्यातील मणिमंगळसुत्र, कानातील दागिने आदि लाखो रुपयांचा किंमती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
नगर - पाथर्डी महामार्गावरील करंजी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. येथुन १० किलोमिटर अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. येथे असलेल्या औटपोस्टला कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही याकडे पोलिस खाते जाणून -बुजून दुर्लक्ष करित आहे. गेल्या सहा महिन्यात येथील हॉटेल फोडण्याच्या सत्रानंतर या चो-यांचे लोण गावभर पसरले असल्यामुळे ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे. गावात रात्री झालेल्या चो-यांचा तपास पोलिस खात्याने येत्या आठ दिवसात न लावल्यास तसेच येथील औट- पोस्टवर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक न केल्यास ग्रामस्थ तिव्र आंदोलन करतील असा इशारा नवनिवार्चीत सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती अॅड. मिर्झा मणियार, राजेंद्र क्षेत्रे, सुभाष अकोलकर, श्रीकांत अकोलकर, संतोष अकोलकर, शिवाजी भाकरे, बबनराव अकोलकर, रावसाहेब क्षिरसागर, संपत क्षेत्रे, गोपिनाथ अकोलकरसह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.