कोपरगावात गॅस टाकीचा स्फोट : फुगेवाला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:08 PM2019-01-15T16:08:21+5:302019-01-15T16:09:31+5:30
गॅस टाकीचा स्फोट होऊन गॅसचे फुगे बनविणारा फुगेवाला जागीच ठार झाला.
कोपरगाव : गॅस टाकीचा स्फोट होऊन गॅसचे फुगे बनविणारा फुगेवाला जागीच ठार झाला. ही घटना मकरसंक्रातीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजण्याच्या कोपरगाव येथे सुमारास घडली. जुबेर रशीद पठाण (वय ४०, रा. गांधीनगर, कोपरगाव) असे यात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.
कोपरगाव शहरातील एस.जी. विद्यालयाजवळील चौकात मकरसंक्रांतीनिमित्त जुबेर रशीद पठाण हे गॅसचे फुगे विक्री करीत होते. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फुगे भरणाऱ्या गॅस टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की फुगे विकणारा जुबेद पठाण हे जागीच ठार झाले. दरम्यान यावेळी त्यांच्या जवळपास कोणी नसल्याने मोठी घटना टळली. या टाकीचा स्फोटाच्या आवाजाने जवळ राहणाºया नागरिकांना हादरा बसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी जखमी झालेल्या फुगे विक्रेत्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मिनाज रशीद पठाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार पोलिसांनी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे.