जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हीरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:22 AM2021-03-01T04:22:59+5:302021-03-01T04:22:59+5:30

राहुरी : अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने कर्डिले हेच या निवडणुकीत हीरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि ...

Kardile became the hero in the district bank election | जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हीरो

जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हीरो

राहुरी : अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने कर्डिले हेच या निवडणुकीत हीरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंध राहून पुढील निवडणुका लढविणार आहोत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले. या वेळी त्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर वीज प्रश्नी टीका केली.

राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजी कर्डिले यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार सुजय विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब तनपुरे होते. विखे पुढे म्हणाले की, राहुरीतील मंत्री असताना शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते हे दुर्दैव आहे. खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबरोबर अन्यायाचे धोरण घेतले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रार आहेत, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, नगर जिल्ह्यात सर्व नातेवाईक कार्यकर्त्यांना आता तुम्ही समजून सांगण्याची खरी गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल तर याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीकर यांचाच नाही तर सर्व जिल्ह्याचा प्रश्न आहे. आपण मागच्या दाराने प्रवेश करणार नाही, तर राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढवणार आहे. बंद पडलेला डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली. यापुढेही सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी नामदेवराव ढोकणे, दत्ता पाटील दुस, उत्तम मसे, सुभाष गायकवाड, सुरेश बानकर, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, रवींद्र मसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, भय्यासाहेब शेळके, अनिल आढाव, प्रभाकर हरिचंदरे, जब्बार पठाण, साहेबराव तोडमल, साहेबराव म्हसे, सीताराम ढोकणे, आर.आर. तनपुरे उपस्थित होते.

....

वाड्यावर जाणाऱ्याला आमच्याकडे प्रवेश नाही

आपल्या मंडळातील पदाधिकारी असो किंवा नातेवाईक कार्यकर्ता असो, ज्यांना वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जा. मात्र, त्यांना परत आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आली तर मी आणि कर्डिले कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

...

Web Title: Kardile became the hero in the district bank election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.