केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:43 PM2018-01-24T19:43:47+5:302018-01-24T19:44:10+5:30

केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Kareli-Godavadi village wedding with rituals are banned | केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

कोतूळ : कोतूळ परिसरातील केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच लग्न व कौटुंबिक उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेत नवा आदर्श पायंडा पाडण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले.
आदिवासी भागातील या गावात सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन गावातील कोणत्याही शेतक-यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी गावात लग्नातील मानपान, सत्कारासाठी कपडे, वस्तू देण्यास व घेण्यास बंदी लागू केली. तसेच गावातील कोणीही परगावी देखील सत्कार घेणार नाहीत. तसेच गावातील विवाह साधेपणाने पार पाडण्याचे ठरले. लग्नातील उधळपट्टीवर बंदी घालण्यात आली. गावातील श्रीमंत व गरीब मुलामुलींचे विवाह सारख्याच पद्धतीने होतील, असा ठराव गावक-यांनी केल्याने या गावाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
यावेळी गोविंद गोडे, भागा गोडे, भीमा गोडे, मधुकर गोडे, वसंत गोडे , संजय गोडे, भाऊराव गोडे, संजय धराडे, जयराम पारधी, रामभाऊ गोडे, चिमाजी गोडे, बाळू लेंभे, बुधा गोडे, सखाराम वंडेकर, पुंडलिक गोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kareli-Godavadi village wedding with rituals are banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.