कर्जत-कुळधरण रस्त्याचे काम दर्जाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:03+5:302021-01-13T04:53:03+5:30

कर्जत : कर्जत-कुळधरण रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय हे काम पूर्ण होण्यापूर्वीच ते उखडले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठी ...

Karjat-Kuldharan road work is substandard | कर्जत-कुळधरण रस्त्याचे काम दर्जाहीन

कर्जत-कुळधरण रस्त्याचे काम दर्जाहीन

कर्जत : कर्जत-कुळधरण रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय हे काम पूर्ण होण्यापूर्वीच ते उखडले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

राहाता, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा हा राज्य मार्ग क्रमांक ६७ आहे. या राज्य मार्गावर दहा किलोमीटर काम करण्यासाठी राज्य सरकारने माजी मंत्री राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे २०१९ मध्ये परवानगी दिली. या कामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कर्जत ते कुळधरणदरम्यान या रस्त्याचे दहा किलोमीटरचे काम होणार आहे. यामध्ये रुंदीकरण मुरूम टाकणे, खडीकरण, अस्तरीकरण, डांबरीकरण ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला कामासाठी लागत असलेले मटेरियल टाकले आहे. याचा वाहनांना मोठा अडथळा होत आहे. आतापेक्षा पूर्वीचाच रस्ता बरा होता असे वाहनचालक सांगत आहेत.

.....

कर्जत-कुळधरण रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. हे काम दर्जेदार करून घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या कामावर माझे लक्ष आहे. झालेले काम ताजे असताना येथून वाहने गेली की अशी कामे उखडत असतात. काम दर्जेदार करून घेऊ.

- अमित निमकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत.

....

१२ कर्जत-कुळधरण रोड

...

ओळी- कर्जत-कुळधरण रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Karjat-Kuldharan road work is substandard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.