कर्जत तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमाफी परीपत्रकाची होळी
By Admin | Published: July 4, 2017 01:46 PM2017-07-04T13:46:23+5:302017-07-04T13:46:23+5:30
कर्जत तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या कर्जमाफी परिपत्रकाची होळी करण्यात आली तसेच यावेळी सरकारी निर्णयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कर्जत तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या कर्जमाफी परिपत्रकाची होळी करण्यात आली तसेच यावेळी सरकारी निर्णयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक. तालुकाध्यक्ष अशोक जगताप. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, संजय तोरडमल, डॉ. राजेंद्र निकत. थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, मिलिंद बागल,चंद्रकांत जगताप, विश्वास तनपुरे, बाळासाहेब सांगळे सहभागी झाले होते.
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफीचा फेरविचार करावा. २००९ पासुन जे शेतकरी थकीत आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा. शासनाने संपुर्ण कर्ज माफी जाहीर करावी. तसेच दुध दर वाढीची घोषणा फसवी आहे. अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.