कर्जत होणार कचरामुक्त शहर
By Admin | Published: October 10, 2016 12:41 AM2016-10-10T00:41:51+5:302016-10-10T01:05:52+5:30
कर्जत : कर्जत नगरपंचायतीसाठी दोन घंटा गाड्या दाखल झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले़
कर्जत : कर्जत नगरपंचायतीसाठी दोन घंटा गाड्या दाखल झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले़ शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीने आश्वासक पाऊस उचलल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़
कर्जत नगरपंचायतीला शहरातील कचरा उचलण्यासाठी दोन घंटा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी या दोन घंटा गाड्या मिळाल्या आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांनी या गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या दोन गाड्यांसाठी बारा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ कर्जत शहर व उपनगरांतील कचरा व्यवस्थापन या गाड्यांमुळे उत्तम होणार आहे, असे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी या वेळी बोलताना सांगितले. या घंटा गाड्यांचे पूजन कर्जत नगरपंचायतीच्या बांधकाम समितीच्या सभापती मनीषा सोनमाळी व नगरसेविका राणी गदादे यांनी केले़ या वेळी माजी सरपंच संतोष म्हेत्रे, नगरसेवक सचिन घुले, अक्षय राऊत, तारेक सय्यद, डॉ. संदीप बरबडे, वैभव शहा, ओंकार तोटे, नितीन तोरडमल, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)