प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जतमध्ये खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:20 PM2017-10-24T17:20:35+5:302017-10-24T17:23:09+5:30

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Karunj murder case in Pune | प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जतमध्ये खून

प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जतमध्ये खून

कर्जत (अहमदनगर) : प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात तुकाई डोंगराजवळ कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा भाऊ बसवराज पाचवे याने फिर्याद दाखल केली होती. तपास अधिकारी दिगंबर जाखडे यांनी या घटनेचा तपास करीत शेवटी हा अपहरण झालेला युवक कोणाबरोबर दिसला, हे शोधले़ त्याला शेवटी पाहणारे दोन साक्षीदार भेटले. संशयावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच शेखर पाचवेच्या खुनाला वाचा फुटली. आरोपींच्या नातेवाईक असलेल्या मुलीला शेखर पाचवे हा त्रास देत होता, म्हणून त्याचा काटा काढल्याची बाब आरोपींनी कबूल केली. शेखर पाचवेला चार चाकी गाडीने कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात तुकाई डोंगराजवळ आणण्यात आले. तेथे त्याच्यावर धारदार कोयत्याने बारा वार करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला. शेखर पाचवेचा मृतदेह बिटकेवाडी ते चांदे या रोडलगत टाकून आरोपी पसार झाले. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सौरभ कंधारे व बंटी ऊर्फ प्रमोद वाघ या दोघांना अटक केली आहे. या आरोपींना घेऊन पुणे येथील पोलीस पथक मंगळवारी घटनास्थळी आले. आरोपींनीच पोलिसांना घटनास्थळ दाखवले. यानंतर या मयत युवकाचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. येथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी दिगंबर जाखडे व अभिजित जोगदंड हे उपस्थित होते. यावेळी कर्जत पोलिसांनी त्यांना मदत केली. या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा खून कर्जत तालुक्याच्या हद्दीत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title: Karunj murder case in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.