राष्ट्रवादीकडून कातोरे, शेटिया, भाजपचे अांंधळे स्वीकृत, सेनेचे शेळके,आढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 01:19 PM2020-10-01T13:19:18+5:302020-10-01T13:19:39+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अॅड. राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी महापालिकेच्या सभेत केली.

महापालिकेची आज दुपारी एक वाजता आॅनलाईन सभा झाली. या सभेत गटनेत्यांकडून आलेली बंद पाकिटे आयुक्तांनी तपासली. त्यानंतर पाचही नावांची घोषणा महापौर वाकळे यांनी केली. पाचपैकी सेनेचे शेळके, व राष्ट्रवादीचे शेटिया यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचा आक्षेप होता. मात्र तोही निकाली काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कातोरे, शेटिया यांची नावे याआधीच निश्चित करण्यात आली होती. शिवसेनेची नावेही हयात असतानाच स्व. अनिल राठोड यांनी निश्चित केली होती. राठोड यांच्या निधनानंतरही कोणतीही गडबड न करता त्यांचा शब्द पाळला आणि दोघांची शिफारस केली. राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांनीही दोघांच्या नावाला संमती दिली.
भाजपमध्येच धुसफूस सुरू होती. मात्र महापालिका निवडणूक झाल्यानंतर भाजपने आंधळे यांचे नाव अंतिम केले होते. त्यांचे नाव यापूर्वीच्या सभेत फेटाळण्यात आले होते. मात्र गुरुवारच्या सभेत ते निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपमध्ये आता त्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.