केदारेश्वरचे पुढील हंगामासाठी ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:51+5:302021-04-27T04:20:51+5:30
बोधेगाव : यंदा कारखान्याने ४ लाख ६ हजार १२४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून पुढील हंगामासाठी ५ लाख ...
बोधेगाव : यंदा कारखान्याने ४ लाख ६ हजार १२४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून पुढील हंगामासाठी ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सोमवारी (दि. २६) सकाळी यशस्वीपणे सांगता करण्यात आली. कारखान्याने यंदा नैसर्गिक आपत्ती व अडीअडचणींवर मात करून २०२०-२१ मधील गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. सोमवारी कारखान्याचे उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, संचालक त्रिंबक चेमटे, संदीप बोडखे, मोहनराव दहिफळे आदींच्या हस्ते विधिवत पूजा करून हंगामाची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, मुख्य रसायन तज्ज्ञ के. डी. गर्जे, मुख्य अभियंता प्रवीण काळूसे, केन सुपरवायझर किसन पोपळे, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरट, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार आदी उपस्थित होते.
यावेळी ढाकणे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यंदा ४ लाखांहून अधिक उसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्तापित केला. सर्वांच्या विश्वास व मेहनतीच्या जोरावर हे शक्य झाले. कारखान्याने चालू हंगामातील सर्वांची देणी वेळेवर अदा केली असून राहिलेले उसाचे पेमेंट देखील पुढील महिन्यात बँकेत वर्ग करण्यात येईल. तसेच पुढच्या हंगामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे, तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या व्यवस्थापनाखाली तयारी सुरू केल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
---
२६ केदारेश्वर
बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची विधिवत पूजा करून सांगता करण्यात आली.