केडगाव हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:29 PM2018-05-12T12:29:23+5:302018-05-12T12:35:39+5:30
केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे. हत्येचा कट करणा-यांना फाशीची शिक्षा होण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. मयत संजय कोतकर यांचा मुलगा व या घटनेतील फिर्यादी संजय कोतकर, मयत वसंत ठुबे यांचा भाऊ प्रमोद ठुबे, सुनीता कोतकर व अनिता ठुबे, महापौर सुरेखा कदम याही उपोषणास बसल्या आहेत.
याबाबत शुक्र्रवारी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील या निवेदनात म्हटले आहे की, ७ एप्रिल रोजी केडगाव येथे आमच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषांची हत्या झाली़ या घटनेनंतर तपासी अधिकाºयांना आवश्यक ती माहिती देण्यात आली़ या बाबत मात्र काहीच तपास झालेला नाही़ निवडणुकीच्या वादातून संजय कोतकर व वसंत ठुबे यांची कट करून हत्या झाली़ आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप, आमदार संग्राम जगताप व भानुदास कोतकर यांनी कट करून हे हत्याकांड घडवून आणले़ या प्रकरणी संग्राम जगताप व इतर काही जणांना अटक झालेली आहे़ कर्डिले, अरूण जगताप यांना मात्र अद्यापपर्यंत अटक झालेली नाही़ या गुन्ह्यातील आरोपी भानुदास कोतकर व त्याची सून सुवर्णा कोतकर यांचे हत्याकांडापूर्वी फोनवरून संपर्क झालेला आहे़ याबाबत पोलीस कोतकर याला अटक करू शकलेले नाहीत़ कर्डिले व जगताप यांचे घर व हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे़ जगताप व कर्डिले यांना स्टॅडिंग वॉरंटमधून वगळ्यात आले आहे़ केडगाव तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसैनिक स्वत:हून पोलिसांसमोर हजर होत असताना पोलीस रात्री अपरात्री त्यांना अटक करत आहेत़ हत्याकांडाच्या तपासाकडे दुर्लक्ष करून आमच्या कुटुंबावर दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे़ या सर्व बाबींच्या निषेधार्थ आम्ही दोन्ही कुटुंबातील सदस्य व आमचे नातेवाईक मयत संजय कोतकर यांच्या केडगाव येथील आज सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार सुरु करण्यात आले आहे. या हत्याकांडाचा योग्य पद्धतीने तपास झाला नाही तर तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी याचिका दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे़