केडगावमध्ये निम्म्याहून अधिक पथदिव्यांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:34+5:302021-05-24T04:19:34+5:30

केडगाव : केडगाव उपनगरात जवळपास ४ हजार पथदिवे आहेत. मात्र, यातील निम्म्याहून अधिक पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. ...

In Kedgaon, more than half of the streetlights are lit. | केडगावमध्ये निम्म्याहून अधिक पथदिव्यांची बत्ती गुल

केडगावमध्ये निम्म्याहून अधिक पथदिव्यांची बत्ती गुल

केडगाव : केडगाव उपनगरात जवळपास ४ हजार पथदिवे आहेत. मात्र, यातील निम्म्याहून अधिक पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. या दिव्यांचे साहित्य मिळत नसल्याने हे दिवे बंदावस्थेत असून, बहुतांशी भागात अंधाराचे साम्राज्य आहे. नागरिकांनी याबाबत मागणी करूनही हे दिवे सुरू करण्यात येत नाहीत. त्यामुळे महापालिकेविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून केडगाव परिसरातील पथदिवे बंद असल्‍यामुळे अंधार पसरला आहे. या अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्‍याने नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. केडगाव - सोनेवाडी रस्त्यावरील लोंढे मळा परिसरामध्‍ये शेतकरीवर्ग राहात आहे. या परिसरातील दिवे बंद असल्‍यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. केडगावमधून जाणाऱ्या पुणे महामार्गावरील पथदिवे बंद असल्‍यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केडगाव परिसरातील पथदिव्‍यांची दुरूस्‍ती करण्‍यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाययोजना कराव्‍यात, बंद पथदिवे सुरू करावेत. तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसविण्‍यात यावेत अन्‍यथा कोणतीही पूर्वसूचना न देता कोरोना नियमांचे पालन करत लोकशाही मार्गाने उपोषण करू, असा इशारा पालिकेचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.

याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मी स्‍थायी समितीचा सभापती असताना संपूर्ण शहरामध्‍ये एलईडी पथदिवे बसविण्‍याची प्रक्रिया सुरू केली होती. त्‍यावेळी एलईडी पथदिवे बसविण्‍यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण केले होते. त्यावेळी मनपाने लवकरात लवकर शहरामध्‍ये एलईडी पथदिवे बसविण्‍यात येतील, असे लेखी आश्‍वासन दिले होते. परंतु, आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एलईडी प‍थदिवे बसविण्‍याची निविदा प्रक्रिया न्‍यायालयात गेल्‍यामुळे किती दिवस लागतील, याचा भरोसा नाही. त्यामुळे मनपाने संपूर्ण केडगाव परिसरामध्‍ये एलईडी पथदिवे बसवावेत, अशी मागणी कोतकर यांनी केली आहे.

Web Title: In Kedgaon, more than half of the streetlights are lit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.