केडगाव, शेवगाव प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:19 AM2021-01-17T04:19:19+5:302021-01-17T04:19:19+5:30

मी आणि माझ्या पत्नीने केडगाव आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. नियमानुसार अर्धा तास तेथेच निरीक्षण कक्षात ...

Kedgaon, Shevgaon response | केडगाव, शेवगाव प्रतिक्रिया

केडगाव, शेवगाव प्रतिक्रिया

मी आणि माझ्या पत्नीने केडगाव आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. नियमानुसार अर्धा तास तेथेच निरीक्षण कक्षात आराम केला. मला कुठलाही थकवा, घबराट, चक्कर, मळमळ तसेच इतर कुठलेच साईडइफेक्ट जाणवले नाहीत. उलट नेहमीप्रमाणे मी दिवसभर रुग्ण तपासणी केली.

-डॉ. संजय शिंदे,

केडगाव (फोटो आहे)

--------

शनिवारी बारा वाजल्यानंतर लस टोचून घेतली. त्यानंतर अर्धा तास ग्रामीण रुग्णालयात बसून होतो. दरम्यान, मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवला नाही. रोजच्या प्रमाणे माझे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत.

-भगवान खाडे, बोधेगाव.

--------

मी बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. शनिवारी दुपारी एक वाजता मी लस घेतली. त्यानंतर अर्धा तास तिथे थांबले. मला लस घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. मी रोजच्याप्रमाणे माझे काम करते आहे. लसीचे कोणतेही दुष्परिणाम मला जाणवले नाहीत.

-रेणुका भागवत बटुळे,

(फोटो आहे)

Web Title: Kedgaon, Shevgaon response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.