केडगावला नागरी वसाहतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:30+5:302021-03-09T04:22:30+5:30
केडगाव : मनपावर ज्या ज्या वेळी भगवा फडकला, त्या त्या वेळी केडगावमधील नियोजनबद्ध विकासकामांना गती मिळाली. अनेक वर्षे रखडलेल्या ...
केडगाव : मनपावर ज्या ज्या वेळी भगवा फडकला, त्या त्या वेळी केडगावमधील नियोजनबद्ध विकासकामांना गती मिळाली. अनेक वर्षे रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे काम त्यावेळी झाले.
केडगावला वास्तव्यास येणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, व्यापारी, उद्योजक, विविध शाळा येथे येत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
प्रभाग १६च्या नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या निधीतून अंतर्गत ड्रेनेजलाइनच्या कामाचा प्रारंभ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका सुनीता कोतकर, नगरसेवक विजय पठारे, बबलू शिंदे, ओंकार सातपुते, संग्राम कोतकर, चेतन जाधव, अनिकेत झरेकर, उगलमुगले, डॉ. शेख, चोभे काका, ढवळेताई, देवधरताई व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सुनीता कोतकर म्हणाल्या, या भागातील महिलांनी माझ्याकडे सदर कामाची मागणी केली. येथे अंतर्गत ड्रेनेजलाइन नव्हती. पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यात यामुळे त्रास होत असे. नगरसेवक निधी उपलब्ध होताच हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
सूत्रसंचालन संग्राम कोतकर यांनी केले. ओंकार सातपुते यांनी आभार मानले.