केडगाव दगडफेक प्रकरण : अनिल राठोड कोतवाली पोलीस ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:35 IST2018-08-23T14:28:14+5:302018-08-23T14:35:17+5:30
केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

केडगाव दगडफेक प्रकरण : अनिल राठोड कोतवाली पोलीस ठाण्यात हजर
अहमदनगर : केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केडगावमध्ये दगडफेक करुन पुणे-नगर रस्त्यावर रास्ता रोको केला होता. याप्रकरणी पोलीसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यात माजी आमदार अनिल राठोड यांचाही समावेश होता. यातील काही आरोपींना जामीन मिळाला तर काही आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून अनिल राठोड यांनी जामीन घेतला नव्हता. आज दुपारी राठोड यांच्यासह जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.