केडगाव हत्याकांड : सीआयडीला हवेत आरोपींच्या आवाजाचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:08 PM2018-08-02T13:08:05+5:302018-08-02T13:08:15+5:30

केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांपैकी चार आरोपींच्या आवाजाचे नमुने सीआयडीला घ्यावयाचे असून, त्यासंदर्भात बुधवारी जिल्हा न्यायालयात तपासी अधिकारी यांनी अर्ज सादर केला आहे.

Kedgun assassination: CIDs voice samples of accused in the air | केडगाव हत्याकांड : सीआयडीला हवेत आरोपींच्या आवाजाचे नमुने

केडगाव हत्याकांड : सीआयडीला हवेत आरोपींच्या आवाजाचे नमुने

अहमदनगर : केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांपैकी चार आरोपींच्या आवाजाचे नमुने सीआयडीला घ्यावयाचे असून, त्यासंदर्भात बुधवारी जिल्हा न्यायालयात तपासी अधिकारी यांनी अर्ज सादर केला आहे.
हत्याकांडातील आरोपी संदिप गुंजाळ, बी.एम. कोतकर, संदिप गि-हे व विशाल कोतकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी सीआयडीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस. पाटील यांच्याकडे मागितली आहे. यावर न्यालयाने आरोपी पक्षाचे म्हणने मागितले असून, ६ आॅगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. तपासी यंत्रनेने गुंजाळ याच्यासह इतर आरोपींचे कॉलरेकॉर्ड तपासले आहेत. यातील काहींच्या आवाजाचे नमुने पोलीसांकडे आहेत. त्यामुळे त्या नमुन्यांशी आरोपींच्या आवाजाचे नमुने जुळवून पाहण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंगची परवानगी सीआयडीने मागितली असल्याचे समजते.

सीडी प्रयोगशाळेत
सीआयडीने दोषारोपपत्रात नमूद असलेली व्हिडिओ सीडी आरोपीला दिली नसल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली होती. यावर न्यायालयाने सीआयडीचे म्हणने मागितले होते. यावर सीआयडीच्या तपासी अधिकाऱ्यांनी सदर व्हिडिओ सीडी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असल्याने दिली नाही़ असे म्हणने सादर केले आहे.

Web Title: Kedgun assassination: CIDs voice samples of accused in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.