ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:22 AM2019-10-12T11:22:48+5:302019-10-12T11:23:02+5:30

अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर खूप नुकसान होईल.

Keep the stream of knowledge flowing constantly | ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा

ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा

सन्मतीवाणी
अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर खूप नुकसान होईल.
 ज्ञानामुळे सम्यक दर्शन कळते. आत्मा शाश्वत असतो शरीर नश्वर असते. ज्ञानाचे ५१ गुण असतात. ज्ञानी माणसाशी संवाद करा. संगत करावी, ज्ञानाबरोबर कर्मबंधन होते. सतत ज्ञानाची आराधना केली तर जीवनात बदल घडतो. ज्ञानाचा पांढरा रंग असतो. पांढरा रंग म्हणजे आत्म शुध्दी. ज्या ठिकाणी राग, द्वेष असतात तेथे कर्म शक्ती ज्ञानाला झाकून   टाकते.
कर्र्माचा निचरा करण्यासाठी भक्तीची आराधना करावी लागते. आत्मशुध्दी केली पाहिजे. कबीर म्हणतात की, मैली चादर ओढके कैसे द्वार तुम्हारे आऊ. ज्ञानवर्ती कर्म करण्याचा प्रयत्न करा. संतांना अवधी ज्ञान असते. राग, द्वेष भावना बाजूला ठेवून तप साधना केली तर फळ मिळणारच. सामायिकची साधना सर्वांना करता येण्यासारखी आहे. सामायिक साधनेमुळे मन स्थिर बनते. स्वभावात बदल होतो. काया, वाचा, मन स्थिर करण्यासाठी सामायिक साधना करा. ज्ञानाची आराधना चालू ठेवावी.  
- पू. श्री. सन्मती महाराज

Web Title: Keep the stream of knowledge flowing constantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.