केलवडमध्ये महिनाभरात आठ ठिकाणी चो-या
By Admin | Published: May 29, 2017 01:04 PM2017-05-29T13:04:19+5:302017-05-29T13:04:19+5:30
राहाता तालुक्यातील केलवड गाव भुरट्या चोरट्यांच्या धुमाकुळामुळे चांगलेच हादरले आहे. या गावात महिन्याभरात तब्बल आठ ठिकाणी लहान मोठ्या चो-या झाल्या आहेत.
ल कमत न्युज नटवर्क अस्तगाव (अहमदनगर) : राहाता तालुक्यातील केलवड गाव भुरट्या चोरट्यांच्या धुमाकुळामुळे चांगलेच हादरले आहे. या गावात महिन्याभरात तब्बल आठ ठिकाणी लहान मोठ्या चो-या झाल्या आहेत. पोपट गोडगे यांच्या घरात सुमारे दीड लाखाच्या मालमत्तेची चोरी झाली होती. त्यानंतर काही दिवसातांच पुन्हा गोडगे यांचे घर फोडण्यात आले परंतु यावेळी चोरट्यांचा डाव फसला. रावसाहेब ठोंबरे यांच्या भरदिवसा दोन शेळ्या व गॅसची टाकी चोरीस गेली. सुंदरदास ठोबरे यांच्या शेतातील बोरची मोटार काढुन नेण्यात आली. दीपक कादळकर यांच्या विहीरीतून मोटार चोरण्यात आली तर त्यानंतर सोपान कांदळकर यांच्या शेतातील पाईप चोरण्यात आले. लक्ष्मण कांदळकर यांची विजेची केबल चोरट्यांनी पळविली. गंगाधर कांदळकर यांच्या शेतातील पाण्याच्या नियोजनासाठी असणारा वॉल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पळविला . तर रविवार २८ मे २०१७ रोजी गावातील बाळासाहेब खंडांगळे यांचे मोटारसायकल पंचरचे दुकान फोडण्यात आले. दुकानचे शेटर तोडून चोरट्यांनी मोटारसायकलच्या जवळपास ३० ते ३५ टुपा पळविल्या. केलवड गावातीलच भुरटी चोरट्यांची टोळी वारंवार धुमाकुळ घालत असल्याचा अंदाज काही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. केलवड गाव हे राहाता तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असुन बहुतांश लोक हे वाड्यावस्त्यांवर राहतात. चोरीच्या जास्तीत जास्त घटना ह्या वाड्यावस्त्यावर घडल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहाता पोलिसांचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.