केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नातलगांनीच केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:57 PM2018-02-28T16:57:32+5:302018-02-28T16:58:15+5:30

राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Kesapur: A minor girl was tortured by a minor girl | केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नातलगांनीच केले अत्याचार

केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नातलगांनीच केले अत्याचार

राहुरी : तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींमध्ये एक सख्खा भाऊ व मुलीच्या मामाच्या तीन मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी रात्री उशिरा याबाबत अल्पवयीन मुलीसह तिचे आई, वडील व नातेवाईकांनी राहुरी पोलिसात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी देखील अल्पवयीन आहेत. मुलीच्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर तिला आईने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेले. रूग्णालयात वैद्यकीय तपासणीअंती ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिच्या आई वडिलांना मानसिक धक्काच बसला. अत्याचारित मुलगी व आई वडील केसापूर भागात एका शेताजवळील छप्परात राहतात. शेजारीच अल्पवयीन मुलीचे सख्खे मामा व मामी राहातात. त्यांना तीन मुले आहेत. या तिघांसह तिचा अविवाहित सख्खा भाऊ आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला बाजूच्या शेतात नेऊन अत्याचार करीत असल्याचे मुलीने आईला सांगितले. हा प्रकार लपविण्यासाठी मामीने मुलांना पाठीशी घातल्याचे समोर आले. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चौघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी मुलीचा जबाब घेऊन त्याआधारे गुन्हा दाखल केला. यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना नगरच्या बालन्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून चौघांना ताब्यात घेतले.

Web Title: Kesapur: A minor girl was tortured by a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.