खडकवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यानेच फोडली पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 08:59 PM2018-01-03T20:59:12+5:302018-01-03T20:59:37+5:30

पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

The Khadakwadi Gram Panchayat-employee-washed up the pipeline | खडकवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यानेच फोडली पाइपलाइन

खडकवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यानेच फोडली पाइपलाइन

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीने पाइपलाइन दुरुस्त करून व नवीन रोहित्र बसवून पाणी पुरवठा सुरळीत करुनही राजकीय कुरघोडी करीत पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.
खडकवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी मांडओहळ नदीपात्रातून स्वजलधारा योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गावठाण व वाडी वस्त्यांसाठी करण्यात आल्या आहेत. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यामधील राजकीय दुफळीमुळे उपाय काढता आला नाही. या पाणी टंचाईमुळे अंघोळीसाठी व टॉयलेटसाठी पाणी नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा असून तीव्र पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे हाल होत आहेत. मांडओहळ नदीपात्रातून येणा-या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेतल्याने गावठाणात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील आठवड्यात नवीन रोहित्र बसविण्यात आले. नवीन मोटार बसविण्यात आली. हे सर्व करीत असताना पाणीपुरवठा करणा-या कर्मचा-याने २५ डिसेंबर रोजी मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडले. त्यामुळे पाणी येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्या कर्मचा-यावर कारवाई केली. राजकीय कुरघोडी करून गाव वेठीस धरून माता-भगिनींना त्रास होईल असे कृत्य कोणी करू नये.
-ज्ञानदेव गागरे, उपसरपंच, खडकवाडी.

Web Title: The Khadakwadi Gram Panchayat-employee-washed up the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.