दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:53 AM2020-05-21T11:53:45+5:302020-05-21T11:53:57+5:30

अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

Khakitala Warriors are fighting against the terror of anti-terrorism day / ‘Corona’ | दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

अरुण वाघमोडे
अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.
विस्ताराने महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची आज ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात मात्र अवघे ३२०० पोलीस कार्यरत आहेत. यात वयाची पन्नाशी ओलांडणारे एक हजारच्या आसपास पोलीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ८०० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जनतेच्या संरक्षणासाठी मात्र या आजाराची भीती दूर सारून जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस दररोज सकाळी ड्युटीसाठी घराबाहेर पडत आहे. कामाचा ताण वाढल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना तब्बल सोळा ते अठरा तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. गर्दी कमी करणे, वाहनांची तपासणी, स्थलांतरितांना सुरक्षित पोहोचविणे, विविध ठिकाणी बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई अशी एक ना अनेक कामे सध्या पोलिसांना आहेत. रस्त्यावर आॅन ड्युटी चोवीस तास उभा राहणाºया पोलिसांमुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.
----

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने नगर जिल्ह्याला बाहेरचा बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळातच कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाºयांना फिल्डवरती काम न देता कार्यालयीन काम देण्यात आलेले आहे. वैद्यकीय उपचारासाठी ज्यांना रजेची गरज आहे, त्या कर्मचाºयांना रजा देण्यात आलेली आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे आपले कर्तव्य निभावत आहेत.    

- डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक 

Web Title: Khakitala Warriors are fighting against the terror of anti-terrorism day / ‘Corona’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.