वन्यजिवांच्या पाण्यासाठी टाकळी खातगावच्या तरूणांची धडपड : समतल चर खोदून पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:31 PM2019-01-04T13:31:39+5:302019-01-04T13:31:48+5:30

नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील तरूण मंडळीने एकत्र येऊन गावातील चोपाळा डोंगरावर वन्य जीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली.

Khalgaon youths disagree with water for wild water | वन्यजिवांच्या पाण्यासाठी टाकळी खातगावच्या तरूणांची धडपड : समतल चर खोदून पाणवठे

वन्यजिवांच्या पाण्यासाठी टाकळी खातगावच्या तरूणांची धडपड : समतल चर खोदून पाणवठे

केडगाव : नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील तरूण मंडळीने एकत्र येऊन गावातील चोपाळा डोंगरावर वन्य जीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. चोपाळा हा डोंगर, वडगांव अमली, हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ, टाकळी या चार गावाच्या शिवेवर आहे. हा भाग पूर्णपणे डोंगराळ आहे.
या भागात हिवरेबाजार चे सरपंच पोपटराव पवार यांच्या सहकार्याने आधीच वृक्षलागवड झाली आहे. हिरवाईमुळे हरणाचे व इतर वन्य जिवांचे कळप येथे मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी टाकळी येथील तरूण वगार्ने एकत्र येऊन जमीनीवर समतल चर खोदून त्यात कागद टाकुन या वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.एका चर मध्ये ६०० लिटर पाणी साचेल असे नियोजन केले आहे. टँकरच्या साह्याने हे तरुण वर्ग पाणी आणून वन्यजीवांची तहान भागवत आहे. सर्वत्र पाण्याचे स्रोत अटल्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वन्यजीवांची पाण्यासाठी धडपड सुरू आहे .पाण्याच्या शोधात ते सैरभैर भटकत आहेत. या वन्यजीवांची पाण्यासाठी सुरू असलेली तडफड पाहून त्यांची तहान भागविण्यासाठी ‘एक ओंजळ पाणी मुक्या जीवांसाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शिव संघर्ष ग्रुप टाकळी या मित्र परीवाराने वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले. टाकळी खातगाव येथील अमोल तमणर, विजू शिंदे, शुभम नरवडे, संकेत वाघमोडे, विजय पिसे, दत्ता पिसे, संकेत पिसे, शाम पिसे, सुधीर पिसे, अमोल नरवडे, प्रतीक राऊत, ओंकार भगत, नितीन मोढवे या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपणही सहभागी होऊन या दुष्काळात जगण्यासाठी धडपडत असलेल्या वन्यजीवांना जीवनदान द्यावे असे आवाहन या ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे .

Web Title: Khalgaon youths disagree with water for wild water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.